FIFTH DAY OF NAVRATRI COLOUR AND GODDESS
Skandamata is worshiped on the fifth day of Navratri. Skanda is the mother of Kartikeya. Lord Kartikeya is seated on the lap of Skandamata in the form of a child. Skandamate is also known as the mother of intelligence and wisdom.
Worshiping Skandamata during Navratri increases knowledge and wisdom, which enables one to take his life decisions in the right direction without any fear. That opens the way for progress.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई. भगवान कार्तिकेय बालस्वरूपात स्कंदमातेच्या मांडीवर विराजमान आहेत. स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते.
नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते, ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो. त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो.
Form of Skandamata
The fifth day of Navratri is dedicated to Goddess Skandamata. The Skandamata form of Goddess Durga is considered a symbol of love and affection. Skandamata is believed to be the mother of Kumar Kartikeya. Kumar Kartikeya is also known as Skanda. That is why this form of Goddess is called Skandamata. Kumar Kartikeya was the commander of the gods in the Devasura war. Skandamata is quadrilateral. Kumar Karthikeya is with his mother. Also, the goddess has a lotus flower in her hands. The vehicle of the goddess is the lion. Skandamata is the goddess of the solar system.
स्कंदमातेचे रुप
नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे.
Skandamata Puja Ritual
Wake up early in the morning and take a bath. After this, resolve the fast.
Spread a yellow or red cloth in the temple and place a picture or photo of Skandamata on it. After this Ganga water should be sprinkled in the temple.
After that cover with yellow or red colored chuni. Place flowers, sweets, cloves, cardamom, lamp and banana in the pooja thali.
After this light a lamp and perform aarti and offer flowers, fruits etc.
स्कंदमाता पूजा विधी
1.सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर व्रताचा संकल्प करा.
2.मंदिरात पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर स्कंदमातेचे चित्र किंवा फोटो ठेवा. यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडावे.
3.यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाच्या चुनरीने झाका. पूजेच्या थाळीमध्ये फुले, मिठाई, लवंग, वेलची, दिवा आणि केळी ठेवा.
4.यानंतर दिवा लावून आरती करा आणि फुले, फळे इत्यादी अर्पण करा.
Offering to Skandamate
Banana is offered to Skandamate. Banana should also be offered to Skandamate along with sweets and other fruits. Banana halwa is also offered to seek the special blessings of Skandamata.
Skandamata Mantra
This Goddess Sarvabhuteshu Maa Skandamata Rupen Sansthita
Namastesyai Namastesyai Namastesyai Namo Namah:
स्कंदमातेला नैवेद्य
स्कंदमातेला केळी अर्पण केली जाते. मिठाई आणि इतर फळांसह स्कंदमातेला केळीही अर्पण करावी. स्कंदमातेचा विशेष आशीर्वाद घेण्यासाठी केळीचा हलवाही अर्पण केला जातो.
स्कंदमाता मंत्र
या देवी सर्वभूतेषू मां स्कंदमाता रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
FIFTH DAY COLOUR: WHITE
FIFTH DAY GODDESS: SKANDAMATA