DIWALI PADWA 2024 (BALIPRATIPADA)

DIWALI PADWA 2024
October 24, 2024

DIWALI PADWA 2024 (BALIPRATIPADA)

After the Lakshmi Puja on the new moon day of the month of Ashwin, Bali Pratipada is celebrated as Diwali Padwa on Kartik Suddha Pratipada. The importance of this day is highlighted in many aspects such as preference for buying gold, charms for husbands from bridegrooms, beginning of the year for traders.

Padavya takes the image of the victim with panchrangi rangoli and worships her. A prayer is offered on this day, ‘Ida, avoid pain and let Bali’s kingdom come’. Firecrackers are set off, as well as Deepotsav. The special feature of this day is that it is one of the three and a half Muhurtas and is considered very auspicious.

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

DIWALI PADWA 2024

DIWALI PADWA 2024 the wife draws rangoli around the table in the evening and the husband gives some gifts to the wife in the form of a wave. The first Diwali of the newly wedded couple is to celebrate the wife’s marriage, which is called Diwalsan. On this occasion, it is recommended to go to Yadivasi. Vikram Samvat calendar starts on this day.

King Vikramaditya of Ujjain repulsed the invasion of the Sakas and defeated them. As a symbol of that victory, Vikramaditya started the Vikrasamvata chronology. etc. S. This chronology has been prevalent since 57 BC. etc. S. It is an example of the grandeur of ancient civilizations, universal civilizations and one-umbrella polity.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे.

DIWALI PADWA 2024 Given mythological importance due to our agrarian culture, all our festivals are primarily based on this nature. This starting day of the month of Kartik is considered very important as it has mythological significance and reflects the agrarian culture.

Purvapar is considered as a new beginning. This year, Diwali Padwa and Balipratipada will be celebrated on Saturday, November 02, 2024. This year Deepotsava will be concluded on November 3rd at Bhaubije. Let’s know the significance, beliefs, traditions and mythological stories of Diwali Padwa…

DIWALI PADWA 2024

आपल्याकडील कृषिप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आपले सर्व सण-वार या निसर्गावरच प्रामुख्याने आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे.

पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. यंदा शनिवार, ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा साजरा होणार आहेत. तर ०३ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेने यंदा दीपोत्सवाची सांगता होणार आहे. दिवाळी पाडव्याचे महत्त्व, मान्यता, परंपरा आणि पौराणीक कथा जाणून घेऊया…

According to the mythological stories about Balipratipada, this day is also called Dyut Pratipada as Parvati defeated Mahadev in a game of dyut on this day. Bali, the king of Asuras, was the grandson of devotee Prahlada and son of Virochana. Despite being born in a demon clan, Baliraja was known as a characterful, humble, public-spirited king.

This king was also famous as a philanthropist. But, later he defeated even the gods under the influence of increasing power. Baliraja performed a yagna. After this sacrifice, it was customary to give charity. Lord Vishnu assumed Vamanavatar and stood in front of Baliraja dressed as a dwarf. In this form, Vamana asked for three steps of land.

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌.

दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

Waking up to the promise, when Baliraja was ready to give this donation, Vishnu incarnated as Vamana assumed a huge form and covered heaven and earth. As there was no space left for the third step, Baliraja put his head forward to fulfill his promise. Then Vamana stepped on Baliraja’s head and gave him the kingdom of Patal Loka.

Even though Baliraja became proud, due to his virtues of sattvasheel and charity, Baliraja was awarded the kingdom of Patal Loka and was given a boon that people will worship your generosity and forgiveness on Kartik Pratipada. A prayer is offered on this day, ‘Ida, avoid pain and let Bali’s kingdom come’. Firecrackers are set off, as well as Deepotsav.

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले.

बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.

To read about the information of Laxmi poojan click here

Click here to explore our technical knowledgeable website

Click here to explore our stock market knowledgeable website

Tags: , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *