DUSSEHRA FESTIVAL 2024
History of Dussehra Festival-
Dussehra falls two to three weeks before Diwali. Dussehra is also known as Vijayadashami in some regions of India. If we keep regional differences aside, there is only one main reason behind this festival, the victory of good over evil. In simpler words, the festival of Dussehra conveys the message that good power always triumphs over evil. Dussehra has two stories. The word Dussehra is derived from two Hindi words ‘Das’ and ‘Hara’, where Das means 10-headed Ravana, and Hara means defeat. On the day of Dussehra, Lord Rama killed this ten-headed visionary Ravana, and the day is called Dussehra because the victory of good over evil.

Dussehra is the tenth day after the ninth Mali of Navratri. Hence in Hindu mythology it is said that on this day Goddess Durga killed a demon named Mahishasura. We celebrate Dussehra because he was destroyed from the earth. Thus, if we read both the stories, we get the same meaning. Light always triumphs over darkness, truth over falsehood and good over evil.
दसरा सणाचा इतिहास-
दसरा हा दिवाळीच्या दोन ते तीन आठवड्यांच्या आधी येतो. दसऱ्याला भारतातील काही प्रदेशांमध्ये विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. जर आपण प्रादेशिक फरक बाजूला ठेवला तर, या उत्सवाच्या मागचे एकच मुख्य कारण आहे, ते म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होतो. आणखी सोप्या शब्दांत सांगायचं तर दसरा हा सण वाईट शक्तीवर चांगली शक्ती नेहमी विजयी होते असा संदेश देतो. दसऱ्याच्या दोन कथा आहेत. दसरा हा शब्द ‘दस’ आणि ‘हरा’ या दोन हिंदी शब्दांपासून बनलेला आहे, जिथे दसचा अर्थ १० डोके असलेला रावण, आणि हरा म्हणजे पराजय असा होतो. दसऱ्याच्या दिवशी या दहा डोक्याच्या दृष्ट रावणाचा भगवान रामाने वध केला, आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून या दिवसाला दसरा म्हणतात.
नवरात्रीच्या नवव्या माळीनंतर दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. म्हणून हिंदू पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याला पृथ्वीतलावरून नष्ट केले होते म्हणून आपण दसरा साजरा करतो. अशा प्रकारे आपण जर दोन्ही कथा पहिल्या तर त्यातून एकच बोध मिळतो. अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा नेहमी विजय होतो.
How are Dussehra and Vijayadashami festivals celebrated?
The festival of Dussehra is celebrated with great enthusiasm all over India. An effigy of Ravana is made and burnt on this day. Dramas are experimented in many places. It dramatizes the story of the ten-day battle between Shri Ram and Ravana. This theatrical form is called Ram-Leela.
In these dramas, the dramatists enact this Ram-Leela by wearing masks and through various dance forms and convince people of the importance of Dussehra. In Bengal Dussehra is known as Vijayadashami, Bijoy Dashami. It means the victory achieved on the tenth day of Vijaya and Dasami. It is the tenth day of Durga Puja. On this day, the idol of the goddess is taken out in a grand procession to immerse it in the river.
दसरा या सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी रावणाचा पुतळा बनवून त्याचे दहन केले जाते. अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग होतात. त्यातून श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये दहा दिवस चाललेल्या लढाईची कहाणी नाट्य स्वरूपात दाखवली जाते. या नाट्यरूपाला राम-लीला असे म्हणतात.
या नाटकांमध्ये नाटककार मुखवटे घालून आणि विविध नृत्य प्रकारांद्वारे ही राम-लीला साकारतात आणि दसऱ्याचे महत्व लोकांना पटवून देतात. बंगालमध्ये दसऱ्याला विजयादशमी, बिजॉय दशमी म्हणून ओळखले जाते. विजय आणि दशमी म्हणजेच्या दहाव्या दिवशी मिळालेला विजय असा याचा अर्थ होतो. हा दुर्गापूजेचा दहावा दिवस असतो. या दिवशी देवीची मूर्ती नदीत विसर्जित करण्यासाठी भव्य मिरवणुकीत काढल्या जातात.
Burning of effigy of Ravana-
On Dussehra, huge paperboard effigies of Ravana are made in many places across the country. They then fill it with explosives and burn the effigy. The event is performed in an open field with thousands of spectators. People of all ages enjoy this fair. Witness these Dussehra fireworks and be mesmerized by the mesmerizing sight. Children insist on taking their parents to watch the Dussehra programme.
रावणाच्या पुतळ्याचे दहन-
दसऱ्याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे मोठ्या आकाराचे पेपरबोर्डचे पुतळे बनवले जातात. त्यानंतर ते जाळण्यासाठी ते स्फोटकांनी भरतात आणि तो पुतळा जाळतात. हा कार्यक्रम हजारो प्रेक्षकांसह मोकळ्या मैदानात पार पाडला जातो. ज्यात सर्व वयोगटातील लोक या जत्रेचा आनंद घेतात. दसऱ्याच्या या आतषबाजीचे साक्षीदार होतात आणि आकर्षक दृष्यांनी मंत्रमुग्ध होतात. लहान मुले दसऱ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना घेऊन जाण्याचा आग्रह धरतात.
To read the another information of Vijayadashami Click Here
To read about First day of Navaratri click this link.
To read about Second day of Navaratri click this link.
To read about Third day of Navaratri click this link.
If you want to get news of stock market click here
Tags: DUSSEHRA FESTIVAL 2024
One thought on “DUSSEHRA FESTIVAL 2024”