FORTH DAY OF NAVRATRI COLOUR AND GODDESS

FORTH DAY OF NAVRATRI COLOUR AND GODDESS
October 8, 2024

FORTH DAY OF NAVRATRI COLOUR AND GODDESS

The fourth mala of Navratri is dedicated to Goddess ‘Kushmanda’. ‘Kushmand’ means ‘Kohla’. Numerous seeds in the pods have the ability to regenerate pods. That is, worshiping her for seed generation, reproduction helps in regeneration. The Leela of this mother is origin, creation and eternal existence.

नवरात्रीची चतुर्थ माळ ‘कुष्मांडा’ देवीला समर्पित आहे. ‘कुष्मांड’ म्हणजे ‘कोहळा’. कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच बीजनिर्मिती, पुनरूत्पादनासाठी तीची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते. उत्पती, निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे.

Form of Goddess Kushmanda
The image of Kushmanda Devi is very bright and octagonal. When creation did not exist, this goddess created the universe with her smile, so she is the primordial power of creation. The abode of this goddess is in the solar system. Only this goddess has the power to reside there. Her body is resplendent like the sun. Ten directions are illuminated by her brilliance and light. The brilliance of all objects and beings in the universe is only due to the grace of this Goddess.

‘Kushmanda’ is also said to protect against all kinds of pains. Meditating on Kushmanda Mata purifies the mind. As the mind becomes healthy, the universal knowledge of the mind increases. The mind was bright. Worshiping Goddess Kushmanda cures the disease of devotees. This devotion leads to increase in life, success, strength and health. If a man completely surrenders to the Goddess, he can enter the path of peace and prosperity.

Kushmanda Devi is believed to be the goddess who frees man from disease and leads to happiness, prosperity and progress. This goddess has eight arms. This goddess is also known as Ashtabhuja. Her seven hands hold kamandalu, bow, arrow, lotus flower, amritkalash, chakra and mace respectively. The eighth hand holds a rosary and her vehicle is a lion. Man is always involved in himself. So sometimes negative thoughts, envy, hatred, jealousy continue in his mind. It is not possible to go to the Himalayas to get rid of all these. That is why on these days they do this pooja as they get satisfaction after worshiping the goddess.

DURGA ASHTAMI HAVAN NAVRATRI 2024

कुष्मांडा देवीचे स्वरुप
कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. तिच्या तेज तसेच प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे.

‘कुष्मांडा’ म्हणजे सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी असंही म्हटल जातं. कुष्मांडा मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते. मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते. मन तेजस्वी होते. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.

कुष्मांडा देवीची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते. या देवीला आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. मनुष्य नेहमी स्वत:मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्षा, घृणा, मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात.

Offering to Goddess Kushmanda
A yellow petha or sweets should be kept in the worship of Goddess Kushmanda. Also white items can be kept in pooja. It mainly consists of Malpua and Batashe.

Goddess Kushmanda Puja Mantra
Bija Mantra: Kushmanda: Ain Hri Devyai Namah:
Puja Mantra: Om Kushmandayai Namah:
Meditation Mantra: Vande Vaishin Kamarthe Chandrarghakrit Shekram. Sinharudha Ashtabhuja Kushmanda Yashaswanim.

कुष्मांडा देवीचा नैवेद्य
देवी कुष्मांडाच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा पेठा किंवा मिठाई ठेवावी. तसेच पूजेत पांढऱ्या वस्तू देखील ठेवू शकतात. यात प्रामुख्याने मालपुआ आणि बताशे असतात.

देवी कुष्‍मांडा पूजा मंत्र
बीज मंत्र: कुष्मांडा: ऐं ह्री देव्यै नम:
पूजा मंत्र: ऊं कुष्माण्डायै नम:
ध्यान मंत्र: वन्दे वांछित कामर्थे चन्द्रार्घकृत शेखराम्। सिंहरूढ़ा अष्टभुजा कूष्माण्डा यशस्वनीम्॥

FORTH DAY COLOUR: ORANGE

FORTH DAY OF NAVRATRI  COLOUR AND GODDESS

FORTH DAY GODDESS: KUSHMANDA

 

To read about Navratri Day first blog click here.

Visit our Tech related website techdiary.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *